देशात लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरु केली आहे. ‘इंडी’ आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्यातच भाजपात उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता असून, पहिल्या यादीमध्ये 200 जणांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. अब की बार ४०० पार असा नारा त्यांनी दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. येत्या दोन दिवसांमध्ये भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या २०० उमेदवारांची पहिली यादी तयार असल्याचे समजते आहे. तसेच पंतप्रधान नरेंद मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. त्यांना कोणीही रोखू शकत नाही असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले. भाजपा लवकरच लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान,गोवा, उत्तराखंड, गुजरात, आसाम, झारखंड राज्यांमधील उमेदवारांविषयी चर्चा करण्यात आली आहे. ईशान्येकडील राज्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आलेली नाही. या बैठकीत महाराष्ट राज्यातील उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आलेली नाही. केंद्रीय निवडणूक समितीमध्ये देखील समावेश आहे. त्यामुळे आणि महाराष्ट्रातील भाजपाचे नेते असल्यामुळे देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित होते.