2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 195 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर गृहमंत्री अमित शाह गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, “16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 195 जागांसाठी निवडणूक उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचीही नावे आहेत.”
भाजपची पहिली यादी जाहीर करताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला 370 तर एनडीएला 400 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या काही महिन्यांत आम्ही एनडीएचा विस्तार केला आहे. आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वास आहे.
भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. माझ्यावर कायम विश्वास ठेवल्याबद्दल मी पक्षाचे नेतृत्व आणि निस्वार्थ पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांना सलाम करतो, असे पंतप्रधानांनी लिहिले आहे.
भाजपच्या यादीत अनेक बड्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. पक्षाने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना लोकसभा निवडणुकीत विदिशा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य सिंधिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लखनौमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मनोज तिवारी यांनाही पक्षाकडून तिकीट मिळाले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देखील लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले आहे.
या राज्यांतून भाजपकडे १९५ उमेदवार आहेत
उत्तर प्रदेश – ५१
पश्चिम बंगाल – 20
मध्य प्रदेश – 24
गुजरात – १५
राजस्थान – १५
केरळ – १२
तेलंगणा – 9
आसाम – 11
झारखंड – 11
छत्तीसगड – 11
दिल्ली – ५
जम्मू काश्मीर – २
उत्तराखंड – ३
अरुणाचल प्रदेश – २
गोवा – १
त्रिपुरा – १
अंदमान निकोबार – 1
दमण आणि दीव – १
भाजपने जाहीर केलेली उमेदवारांची पहिली यादी :
उत्तर प्रदेश
वाराणसी: पीएम नरेंद्र मोदी
कैराना: प्रदीप कुमार
मुजफ्फरनगर: डॉ. संजीव कुमार बालियान
नगीना: ओम कुमार
रामपूर: घनश्याम लोधी
संभल: परमेश्वर सैनी
अमरोहा: कंवर सिंह तंवर
नोएडा: डॉ. महेश शर्मा
बुलंदशहर: भोला सिंह
मथुरा: हेमा मालिनी
आग्रा: सत्यपाल सिंह बघेल
फतेहपुर सिक्री: राजकुमार चाहर
एटा: राजवीर सिंह राजू भैय्या
आंवला: धर्मेंद्र कश्यप
शाहजहांपुर: अरुण कुमार सागर
खीरी: अजय मिश्रा टेनी
धौहरा: रेखा वर्मा
सीतापूर: राजेश वर्मा
हरदोई: जय प्रकाश रावत
मिश्रिख: अशोक कुमार रावत
उन्नाव: साक्षी महाराज
मोहनलालगंज: कौशल किशोर
लखनऊ: राजनाथ सिंह
अमेठी: स्मृती इराणी
प्रतापगढ़: संगमलाल गुप्ता
फर्रुखाबाद: मुकेश राजपूत
इटावा: राम शंकर कठेरिया
कन्नौज: सुब्रत पाठक
अकबरपुर: देवेंद्र सिंह भोले
जालौन: भानू प्रताप सिंह
झांसी: अनुराग शर्मा
हमीरपुर: कुंवर पुष्पेंद्र सिंह चंदेल
बांदा: आरके सिंह पटेल
फतेहपूर: साध्वी निरंजन ज्योती
बाराबंकी: उपेंद्र रावत
फैजाबाद: लल्लू सिंह
आंबेडकर नगर: रितेश पांडे
श्रावस्ती: साकेत मिश्रा
डुमरियागंज: जगदंबिका पाल
गोंडा: कीर्तीवर्धन राजा भैय्या
बस्ती: अरविंद द्विवेदी
महाराजगंज: पंकज चौधरी
गोरखपूर: रवि किशन
कुशीनगर: विजय कुमार दुबे
बासगांव: कमलेश पासवान
लालगंज: श्रीमती नीलम सोनकर
आजमगढ़: दिनेश लाल यादव निरहुआ
सलेमपुर: रवींद्र कुशवाह
जौनपुर: कृपा शंकर सिंह
चंदौली: महेंद्र नाथ पांडेय
दिल्ली
चांदनी चौक: प्रवीण खंडेलवाल
उत्तर-पूर्व दिल्ली: मनोज तिवारी
नई दिल्ली: बांसुरी स्वराज
पश्चिम दिल्ली: कमलजीत सहरावत
दक्षिण दिल्ली: रामवीर सिंह बिधूडी
मध्य प्रदेश
मुरैना: शिवमंगल सिंह तोमर
भिंड: नंबर राय
ग्वाल्हेर: भरत सिंह कुशवाह
गुना: ज्योतिरादित्य सिंधिया
सागर: लता वानखेडे
टीकमगड: वीरेंद्र खटीक
दमोह: राहुल लोधी
खजुराहो: वीडी शर्मा
सतना: गणेश सिंह
देवास: मदेंद्र सिंह सोलंकी
मंदसौर: सुधीर गुप्ता
रतलाम: अनिता नगर सिंह चौहान
खरगोन: गजेंद्र पटेल
खंडवा : ज्ञानेश्वर पाटील
बैतूल : दुर्गादास उईके
अंदमान आणि निकोबार बेटे
अंदमान आणि निकोबार बेटे : विष्णू पद रे
अरुणाचल प्रदेश
अरुणाचल पश्चिम: किरण रिजिजू
अरुणाचल पूर्व: तापिर गाओ
आसाम
करीमगंज: कृपानाथ मल्लाह
सिलचर: परिमल सुकलाबैद्य
स्वायत्त जिल्हा: अमर सिंह तिस्सो
गुवाहाटी: बिजुली कलिता मेधी
मंगलदोई: दिलीप सैकिया
तेजपूर: रणजीत दत्ता
नागाव: सुरेश बोरा
कालियाबोर: कामाख्या प्रसाद तासा
जोरहाट: टोपन कुमार गोगोई
दिब्रुगढ: सर्बानंद सोनोवाल
लखीमपुर: प्रधान बरुआ
छत्तीसगड
सरगुजा: चिंतामणी महाराज
रायगड: राधेश्याम रथिया
जांजगीर-चंपा: कमलेश जांगडे
कोरबा: सरोज पांडे
बिलासपूर: तोखन साहू
राजनांदगाव: संतोष पांडे
दुर्ग: विजय बघेल
रायपूर: ब्रिजमोहन अग्रवाल
महासमूद: रूप कुमारी चौधरी
बस्तर: महेश कश्यप
कांकेर: भोजराज नाग
दादर व नगर हवेली तसेच दीव आणि दमण
दमण आणि दीव – लालुभाई पटेल
गोवा
उत्तर गोवा – श्रीपाद योस्सो नाईक