राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच त्यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा देखील वापरण्यात आली होती. तर आता ही धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव किंचल नवले आहे. या आरोपीला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. तसेच त्याला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीने देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा वापरली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दरम्यान, या प्रकरणी आरोपी किंचल नवलेला साताऱ्यातून पोलिसांनी अटक केली आहे. सोबतच हा धमकी दिलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना देखील 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.