दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) आठवे समन्स पाठवले आहे. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच ईडीला सहकार्य करण्याची भाषा केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ईडीला उत्तर देण्यासाठी तयारी दर्शवली आहे. पण त्यांनी त्यासाठी ईडीसमोर एक अट ठेवली आहे.
आत्तापर्यंत अरविंद केजरीवाल यांनी ईडीसमोर हजर होण्यास नकार दिला होता. पण ईडीने आठवेळा समन्स पाठवले असून हे प्रकरण कोर्टात गेले आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल उत्तर देण्यास तयार झाले आहेत. पण यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. ही अट म्हणजे केजरीवाल व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ईडीच्या अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास तयार झाले आहेत. तसेच त्यांनी 12 तारखेनंतर तारीख देण्यास सुचवले आहे.
https://twitter.com/ANI/status/1764494089850912926
27 फेब्रुवारी रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना आठवे समन्स पाठवले होते. तसेच त्यांना 4 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण त्यांनी आठव्यांदा ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला असून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उत्तर देण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच यावेळीही केजरीवाल ईडीचा समन्स अवैध असल्याचे म्हणाले आहेत.
दरम्यान, आम आदमी पक्षाला अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात येईल अशी भीती आहे. त्यामुळे केजरीवालांनी ईडीला व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उत्तर देण्यास सहमती दर्शवल्याचे म्हटले जात आहे.