केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 9 मार्च रोजी पाटणा जिल्ह्यातील पालीगंज येथे येणार आहेत. उपविभागीय मुख्यालय बाजारपेठेत असलेल्या कृषी फार्म मैदानावर ते सभेला संबोधित करणार आहेत. एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर अमित शाह पहिल्यांदाच बिहारमध्ये येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने या रॅलीची तयारी सुरू केली आहे. या रॅलीत भाजप एक लाख लोकांना जमवण्याची तयारी करत आहे. पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघासोबतच आराह, जेहानाबाद आणि पटना साहिब लोकसभा मतदारसंघातूनही लोकांना बोलावण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठीचा रोड मॅप तयार करण्याच्या सूचना सर्व विभागीय समित्यांना देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पूर्व प्रादेशिक परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पाटणा गाठले होते. ज्यामध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. तर अमित शाह यांच्या त्या दौऱ्यावेळी बिहारमध्ये महागठबंधन सरकार होते. आणि नितीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत होते.
दरम्यान, आता बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे. या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर अमित शाह पहिल्यांदाच 9 मार्चला बिहारला भेट देणार आहेत.