पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अनेक क्षेत्रांमध्ये विकास करत आहे. विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करताना दिसत आहे. त्यातीलच एक महत्वाचा भाग म्हणजे दळणवळण. शहरातील वाहतूक सुलभ व्हावी, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी भारत सरकार सर्वच राज्यांमध्ये मेट्रो प्रकल्प उभारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ६ मार्च रोजी कोलकाता येथील पहिल्या अंडरवॉटर म्हणजेच पाण्याखालील मेट्रोचे उदघाटन करणार आहेत. ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता येथे कोट्यवधी विकासकामांच्या प्रकल्पाचे उदघाटन किंवा उभारणी करणार आहेत. अंडरवॉटर मेट्रो हा भारतातील पहिलाच प्रयोग आणि प्रोजेक्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हावडा मैदान ते एस्प्लेनेड या दरम्यानच्या अंडरवॉटर धावणाऱ्या मेट्रोचे लोकार्पण होणार आहे. या मेट्रोमुळे लोकांना वाहतूक करणे सोपे होणार आहे. तसेच नागरिकांचा वेळ देखील वाचणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी ६ मार्च रोजी पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी या मार्गिकेचे लोकार्पण करणार आहेत. रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन माध्यमातून या नवीन मार्गिकेचे लोकार्पण करणार आहेत. रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे अंतर हे साडेपाच किलोमीटर इतके आहे. अनेक दिवसांपासून याचे काम पूर्ण झाले नव्हते. तरीही याच्या उद्घटनाला मुहूर्त लागला नव्हता. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून ६ मार्च ही तारीख मिळाल्याने आता मेट्रो धावण्यास सज्ज झाली आहे. तसेच मेट्रोचा हा टप्पा सुरु झाल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीमधून दिलासा मिळणार आहे.
रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाचे अंतर हे साडे पाच किलोमीटर इतके आहे. साडेपाच किलोमीटरच्या या मार्गामध्ये बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी अशी चार स्थानके आहेत. हा मार्ग सुरु झाल्यामुळे पुणे मेट्रोचे मेट्रो १४ चे काम पुणे होणार आहे. तसेच आता वनाझ ते रामवाडी असा मार्ग सुरु झाल्याने नागरिकांना प्रवास सोपा होणार असून, वाहतूक कोंडीपासून देखील सुटका मिळणार आहे.