मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात वातावरणात अनेक बदल आपल्याला पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे शहरात देखील काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. तसेच सकाळच्या वेळेस कडक ऊन तर रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळेस थंडी असे वातावरण पाहायला मिळत होते. काही दिवस कडक उन्हाळा देखील जाणवत होता. मात्र आता उन्हाळ्याच्या झळा सोसल्यावर पुणे शहराच्या तापमानात घट झालेली दिसून येतेय. पुढील दोन ते तीन दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता असून, तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
देशासह राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक भागांमध्ये हजेरी लावली. देशासह राज्यात अवकाळी पाऊस, भूस्सखलन, गारपिटीमुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार राज्याला आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची शक्यता कायम आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. पावसामुळे थंडीत वाढ झालेली पाहायला मिळतेय. पुढील एक ते दोन दिवसांमध्ये विदर्भ, अमरावती, अकोला, परभणी या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. काही भागांमध्ये पावसाबरोबर गारपीट देखील झालेली पाहायला मिळाली. अवकाळी पाऊस आणि भूस्सखलन यामुळे विविध भागांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशासह राज्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील २४ तासांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे काही ठिकाणी हवेत गारठा पाहायला मिळत आहे. सकाळच्या वेळेस थंडी आणि दुपारच्या वेळेस कडक ऊन असे काहीसे वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत.