नुकताच एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ईमेल आयडी हॅक करून राज्यपाल रमेश बैस यांना एक मेल पाठवण्यात आला आहे. या मेलद्वारे राज्यपालांकडे एक मागणी देखील करण्यात आली आहे. तर या हॅकिंग प्रकारामुळे राहुल नार्वेकरांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला असून या प्रकरणी मुंबई मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मेल आयडी हॅक करण्यात आला आहे. तसेच मेल आयडी हॅक केल्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांना एक मेल करण्यात आला आहे. या मेलमध्ये आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार सभागृहामध्ये नीट वागत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या मेलमधून करण्यात आली आहे.
राहुल नार्वेकरांना ईमेल हॅक झाल्याची धक्कादायक बाब सोमवारी दुपारी चार वाजता लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.