भारतीय बाजारात अनेक वाहन कंपन्या आपल्या नवीन कार्स लॉन्च करत असतात. सध्या देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी हळू हळू वाढताना दिसून येत आहे. BYD इंडियाने अखेर देशांतर्गत बाजारात Seal ईव्ही लॉन्च केली आहे. BYD या मॉडेलची विक्री दोन बॅटरी पर्यायांसह करणार आहे. पहिल्या बॅटरी पॅकमध्ये 61.44 kWh आहे जो फक्त डायनॅमिक रेंज व्हेरियंटसह ऑफर केले जाणार आहे. तसेच दुसऱ्या बॅटरी पॅकमध्ये 82.56 kWh बॅटरी पॅक मिळणार आहे. डायनॅमिक रेंज आणि प्रीमियम रेंज व्हेरियंट रियर-व्हील ड्राइव्ह पॉवरट्रेनसह ऑफर केले जातील. तर, परफॉर्मन्स व्हेरियंट ऑल-व्हील ड्राइव्ह पॉवरट्रेनसह येतो.
बीआयडी कंपनीने भारतात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. दरम्यान कंपनीने या कारचे बुकिंग देखील सुरु केले आहे. तुम्ही या कारचे बुकिंग १ लाख २५ हजार रुपये टोकन रक्कम भरून करू शकणार आहेत. डायनॅमिक रेंज आणि प्रीमियम रेंज व्हेरियंट रियर-व्हील ड्राइव्ह पॉवरट्रेनसह ऑफर केले जातील. तर परफॉर्मन्स व्हेरियंट ऑल-व्हील ड्राइव्ह पॉवरट्रेनसह येतो. सर्व तीन रूपे पॉवर आउटपुटचे विविध व्हेरिएंटतयार करतात. त्यांची किंमत अनुक्रमे ४१ लाख, ४५ लाख आणि ५३ लाख रुपये इतकी आहे. बीवायडी इलेक्ट्रिकच्या या सर्व व्हेरिएंटची किंमती या एक्स शोरूम आहेत.
पॉवरट्रेन आणि रेंज Seal ईव्ही मधील डायनॅमिक रेंज असलेले व्हेरिएंट २१० बीएचपी आणि ३१० एनएम टॉर्क जनरेट करते. तर प्रीमियम रेंज मॉडेल हे ३०८ बीएचपी आणि ३६० एनएम टॉर्क जनरेट करते. डायनॅमिक रेंज एका चार्जवर ५१० किमी पर्यंत धावण्यास सक्षम असेल. त्याचवेळी, प्रीमियम रेंजसाठी त्याची रेंज ६५० किमी धावण्यास सक्षम असेल. तर परफॉर्मन्स व्हेरिएंट असलेले मॉडेल ५८० किमी धावण्यास सक्षम असेल.