राज्यातील कंत्राटी वीज कामगार हे बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील राज्यातील ४२ हजारांपेक्षा जास्त कंत्राटी वीज कामगार हे मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वात हा संप करण्यात आला आहे. राज्यातील महावितरण आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी संपत सामील झाले आहेत. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये ४२ हजार कमर्चारी आहेत. नागपूरच्या कोराडी औष्णिक केंद्रात वीज केंद्र कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
कोराडी औष्णिक केंद्रातील कंत्राटी कर्मचारी काल मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, पारेषण आणि महानिर्मितीचे कंत्राटी कमर्चारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात देखील वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निर्मिती केंद्राच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले आहे. राज्यातील सुमारे ४२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीज कंपन्यातील रिक्त पदांवर सामावून घ्या अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण यामध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी कामगार आहेत. राज्यातील सुमारे ४२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीज कंपन्यातील रिक्त पदांवर सामावून घ्या अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. तसेच कंत्राटी कमर्चारी स्थायी होईपर्यंत तिथे नियमित भरती करू नये अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मागण्या मान्य न झाल्यास ५ मार्च म्हणजे आजपासून कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला होता. मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.