जागतिक नेत्यांच्या नवीनतम मान्यता रेटिंग यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अव्वल स्थानावर आहेत. त्यांना ७५ टक्के मान्यता मिळाली आहे. अप्रूव्हल रेटिंग (PM Narendra Modi Approval Rating) सर्वेक्षण एजन्सी Ipsos IndiaBus नुसार, PM मोदींनी फेब्रुवारी 2024 मध्ये 75% ची मान्यता रेटिंग प्राप्त केली आहे.
याआधी, सप्टेंबर 2023 मध्ये जाहीर झालेल्या डेटामध्ये पीएम मोदींना 65 टक्के रेटिंग मिळाले होते. यावेळी त्यांचे अप्रूव्हल रेटिंग 10 टक्क्यांनी वाढले आहे. डिसेंबर 2022 पासून पीएम मोदींचे अप्रूव्हल रेटिंग वाढले आहे. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानांचे रेटिंग 60 टक्के होते. तर फेब्रुवारी 2023 मध्ये पीएम मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 67 टक्के होते. तसेच सप्टेंबर 2023 मध्ये त्यांचे रेटिंग दोन टक्क्यांनी घटले आणि 65 टक्के रेटिंग मिळाले. आता फेब्रुवारी 2024 मध्ये मोदींचे रेटिंग पुन्हा वाढले आहे.
इप्सॉस इंडियाचे कंट्री सर्व्हिस लाइन लीडर पारिजात चक्रवर्ती यांनी सर्वेक्षणाच्या निकालांवर सांगितले की, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा पंतप्रधान मोदींना खूप फायदा झाला आहे. यामुळे त्यांचे रेटिंग सुधारले आहे.
याशिवाय UAE मधील मंदिराचे बांधकाम, अंतराळातील पुढाकार, भारतात G20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन, मेक इन इंडियाला चालना, प्रमुख जागतिक देशांसोबत भारतातील पायाभूत सुविधा करार यासह अनेक मुद्द्यांमुळे पंतप्रधानांच्या मान्यता रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे.