पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 मार्च) 15,400 कोटी रुपयांच्या अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मंगळवारी (5 मार्च) ते कोलकाता येथे पोहोचले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच दिवसांतील हा दुसरा पश्चिम बंगाल दौरा आहे.
पंतप्रधान मोदींनी आज कोलकाता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी शाळकरी मुलांसोबत मेट्रोमध्ये बसून प्रवास केला. मेट्रोमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करताना पंतप्रधान मोदींनी मेट्रो कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.
यावेळी बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार आणि डब्ल्यूबी एलओपी आणि भाजप आमदार सुवेंदू अधिकारी हे देखील पंतप्रधान मोदींसोबत ट्रेनमध्ये उपस्थित होते.
मेट्रो बोगदा कोलकात्याच्या हुगळी नदीखाली बांधला आहे. हा बोगदा 16.6 किलोमीटर लांब आहे. अंडरवॉटर मेट्रो हुगळी नदीच्या तळापासून 32 किलोमीटर खाली धावेल. ही मेट्रो हावडा आणि कोलकाता शहराला जोडेल.
पंतप्रधान मोदी मेट्रोने प्रवास केल्यानंतर कोलकाता येथील एस्प्लेनेड मेट्रो स्टेशनवर पोहोचले. तेथे मोठ्या संख्येने लोकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लोकांनी मोदी-मोदीच्या जोरदार घोषणाही दिल्या. तसेत कोलकाता येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी थेट दक्षिण कोलकाता येथील शिशु मंगल हॉस्पिटल गाठले, जिथे गेल्या अनेक दिवसांपासून रामकृष्ण मिशन आणि मठाचे अध्यक्ष स्वामी स्मरानंद जी महाराज दाखल आहेत.