केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने भाजपाने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नेत्यांचे राज्यतील दौरे वाढले आहेत. दरम्यान आज जळगाव येथे युवा शक्ती संगम कार्यक्रमात संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस, स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी यांच्यावर परिवारवादावरून जोरदार टीका केली आहे. तसेच कलम ३७० वरून राहुल गांधींना देखील टोला लगावला आहे. तसेच अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका केली असून, किमान ५ वर्षांचा तरी हिशेब द्या असा टोला त्यांनी पवारांना लगावला आहे.
जळगाव येथील युवा शक्ती संगम कार्यक्रमात संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ”पवार साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला १० वर्षे झाली. महाराष्ट्रातील जनता ५० वर्षांपासून तुम्हाला सहन करत आहे. ५० वर्षे सोडा, तुम्ही ५ वर्षांचा तरी हिशेब द्या. मी तर १० वर्षांचा हिशेब घेऊन आलोय. या जगामध्ये भीतीला कोणतीही जागा नाही. केवळ ताकदच जगात सन्मान मिळवून देऊ शकते. सर्व युवांनी एकत्रित येऊनतिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना ४०० पार बहुमत देऊन जिकवून द्यावे. ४०० पार मिळण्याप्रमाणे आम्ही काम केले आहे. मतांच्या राजकारणासाठी आपल्या संस्कृतीला यांना दाबून ठेवले. काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी ७० वर्षे रामलल्लाला तंबूत ठेवले. मोदीजींनी भूमिपूजन देखील केले आणि प्रभू श्रीरामांची अयोध्येत भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठपना देखील केली.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. महायुतीने ४५ पेक्षा जास्त लोकसभेच्या निवडणूका जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. विदर्भातील ६ लोकसभा मतदार संघाचा आढावा अमित शहा घेणार आहेत. यासाठी ते पधाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. आणिछत्रपती संभाजीनगर येथे सभेला ते संबोधित करणार आहेत. तसेच लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात राज्यातील महत्वाचे नेते अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच अमित शहा यांनी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथून महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला आहे.