21 फेब्रुवारी रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान हरियाणा-पंजाब सीमेवर खानौरीजवळ शुभकरण सिंग या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. तर आता शुभकरण सिंग याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये काही महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.
पाच डॉक्टरांच्या पथकाने या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, शुभकरण याच्या डोक्यातून गोळीचे काही तुकडे सापडले आहेत. त्यामुळे आता शेकऱ्यांनी केलेला दावा हा खरा ठरला आहे. कारण शुभकरण याचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.
शुभकरण याच्या डोक्याला दोन जखमा आढळून आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच त्यापैकी एक जखम त्याच्यासाठी जीवघेणी ठरली आहे. द ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, शुभकरण याच्या मेंदूच्या दोन्ही गोलार्धांमधून अनेक गोल गोळ्या सापडल्या आहेत.
दरम्यान, आदोलनादरम्यान हरियाणा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर रबर बुलेट आणि अश्रूधुराचा वापर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांनी शुभकरण सिंग याला शहीदचा दर्जा दिला आहे. तसेच त्यांनी शुभकरणला हुतात्मा दर्जा देण्याची मागणीही सरकारकडे केली आहे.