देशासह राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये, देशातील विविध ठिकाणी वाकली पावसाची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रासह देशात अवकाळी पाऊस कोसळताना आपल्याला दिसणार आहे. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे हवेत देखील गारठा पाहायला मिळत आहे. आजही अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अवकाळी पावसाचा इशारा आज आणि उद्या हवामान विभागाने दिला आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. तर तापमानामध्ये घट होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील तापमानात घट होऊ शकते. काही ठिकाणी ढगाळ हवामान असण्याची शक्यता आहे.
आज पूर्व आणि ईशान्य भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मेघालय, नागालँड आणि आसाम यांसारख्या ईशान्येकडील राज्यात आज पावसाची शक्यता कायम आहे. पुढील तीन दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये अवकाळी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.