भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अंतर्गत नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सचे वुश खेळाडू अभिजित बुरगोहेन आणि एच भूमिका देवी यांनी 28 फेब्रुवारीपासून मॉस्को येथे सुरू असलेल्या मॉस्को स्टार्स वुशू चॅम्पियनशिप-2024 मध्ये विशेष कौशलय दाखवत सुवर्णपदक जिकंत भारतासाठी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
बुरगोहेनने सांडा स्पर्धेच्या कनिष्ठ गटात (अंडर-60 किलो) दागेस्तानच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून विजय मिळवला. त्याचप्रमाणे एच भूमिका देवीने ज्युनियर गटात (अंडर-52 किलो) तिच्या रशियन प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीने भारताला तर गौरवच मिळवून दिलाच पण त्याबरोबर या दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पणातच यश कमावले आहे.
नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बुरगोहेन आणि भूमिका यांच्या यशाचा आनंद साजरा केला, सहाय्यक संचालक सत्राजित कचारी यांनी अभिनंदन संदेश पाठवले. वुशू प्रशिक्षक उमेश कुमार यादव यांनी खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्याच्या भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक केले.
याशिवाय, मार्शल आर्टिस्ट लातवांग कमहुआ, जो तिरप जिल्ह्यातील न्यू कोथिन गावचा आहे, त्याने चॅम्पियनशिपच्या 48-किलो गटात सुवर्णपदक मिळवले आहे. . कमहुआच्या उत्कृष्ट कामगिरीने आंतरराष्ट्रीय मंचावर त्याचे यश विशेष उल्लेखनीय आहे. आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे.
तर बुलबुल चौधरीने मॉस्को येथे झालेल्या मॉस्को स्टार वुशू चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेअसून गौरव सोलंकीनेही रौप्यपदक पटकावले आहे.दोघेही कंकरखेडा येथील वॉरियर फाईट क्लबचे खेळाडू आहेत.