देशात लवकरच लोकसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. या महिन्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक अयोग्य कधीही निवडणुकीच्या तारखा आणि आचारसंहिता लागू करू शकते. लोकसभेत एनडीएने अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे. तर ‘इंडी’ आघाडीने देखील एनडीएला ठरविण्यासाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळते आहे. दरम्यान भाजपाने आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ असून त्यात भाजपाने स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. यंदा पुन्हा एकदा राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
२०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. सध्या ते अमेठीच्या विद्यमान खासदार आहेत. मात्र २०२४ ची निवडणूक राहुल गांधी देखील अमेठी आणि वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तसेच प्रियांका गांधी या काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या रायबरेली मतदार संघून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सोनिया गांधी या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. त्यामुळे रायबरेली येथे प्रियांका गांधी निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास प्रियांका गांधी राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून निवडणूक लढवणार नसल्याची पुष्टी काँग्रेसने केली होती. तेव्हापासून या जागेवरून गांधी घराण्यातील आणखी कोणीतरी आपले नशीब आजमावण्याची शक्यता वर्तवली जात होती. या आठवड्यात, रायबरेलीमध्येही अशी पोस्टर्स लावण्यात आली होती, ज्यामध्ये काँग्रेसला या प्रतिष्ठित जागेसाठी प्रियंका गांधी वाड्रा यांना उमेदवारी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पोस्टर्समध्ये ‘काँग्रेसचे विकासकार्य पुढे न्या, रायबरेली बोलवत आहे…प्रियांका गांधी जी, कृपया या.’ असे म्हटले होते. काँग्रेसने आता या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.