बेंगळुरूच्या व्हाईटफिल्डमधील लोकप्रिय रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली. या स्फोटात चार लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटानंतर तेथील परिसरात एकच खळबळ उडाली होती. बेंगळुरूच्या राजाजीनगर येथील कॅफेच्या व्हाईटफिल्ड शाखेत दुपारी एकच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. त्यानंतर बंगळुरू मधील रामेश्वरम कॅफेत झालेल्या स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या बॉम्बस्फोटाचा तपास वेगाने सुरु केला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने बंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील प्रकरणातील हल्ला करणाऱ्याची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वीच हल्ला करणाऱ्या संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एनआयएने दिलेल्या निवेदनामध्ये हल्लेखोराची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच याची माहिती देणाऱ्याची गोपनीय ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बेंगळुरूच्या व्हाईटफिल्डमधील लोकप्रिय रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट झाला. त्यात १० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील एफ सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात एक संशयित एक व्यक्ती टोपी आणि मास्क घातलेला एक व्यक्ती हातात स्फोटके असलेली बॅग घेऊन कॅफेमध्ये येताना दिसत आहे. त्यानंतर त्याने कॅफेत रवा इडली ऑर्डर केली, त्यानंतर सोबत आणलेली बॅग तिथेच ठेवून तो निघून गेल्याचे दिसून येत आहे.रामेश्वरम कॅफे हा बंगळुरूमधील एक प्रसिद्ध कॅफे आहे. हा कॅफे वाइटफिल्डच्या ब्रुकफिल्ड परिसरात आहे. हे बंगळुरू शहरातील टेक हब आणि बिझनेस सेंटर आहे. दरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा देखील शोध आणि तपास पोलीस करत आहेत. तसेच हा संशयित व्यक्तीचा शोध एनआयए घेत आहे.