आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा कसोटी सामना सुरु होणार आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना असणार आहे. आजपासून सुरू होणारा सामना हा धरमशाला येथे खेळला जाणार आहे. भारताने याआधीच ३-१ असे सामने जिंकून मालिका आपल्या खिशात टाकली आहे. तर आहे सामना जिंकून विजयी चौकार मारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. तर किमान शेवटचा सामना जिंकून या मालिकेचा शेवट गोड करावा यासाठी टीम इंग्लंड सज्ज झाली आहे. अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल निश्चित समजला जात आहे. कारण जसप्रीत बुमराह भारतीय संघात परतला आहे.
अखेरच्या भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्मा दोन बदल करण्याची शक्यया आहे. आकाशदीपच्या जागेवर भेदक गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रजत पाटीदारला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याऐवजी देवदत्त पडिकलला संधी मिळण्याची शक्यता आहे. केएल राहुल नसल्यामुळे रजत पाटीदार याला संधी देण्यात आली हत्ती. मात्र रजत पाटीदारला या सामन्यांमध्ये साजेशी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच कुलदीप यादव ऐवजी अक्षर पटेलला देखील संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
इंग्लंडने हैद्राबाद येथील सामन्यात भारताचा पराभव करत मालिकेत चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर भारताने इंग्लडला विजयाची संधी दिली नाही. यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजाने तर या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिला सामना हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने सलग तीन सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. आता टीम इंडिया विजयी चौकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने भारतीय संघ आत्मविश्वासाने या सामन्यात खेळेल. सात मार्च म्हणजे आजपासून धरमशाला या मैदानावर भारत इंग्लंड यांच्यातील ५ वा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना जिंकून विजयी चौकार मारण्याचा प्रयत्न भारत नक्कीच करेल. जसप्रीत बुमराह यांचे कमबॅक झाल्यामुळे भारताची गोलंदाजी मजबूत झाली आहे. भारत इंग्लंड यांच्यातील अखेरचा सामना हा आज सकाळी ९.३० वाजता सुरु होणार आहे.