२०२० मधील टीआरपीच्या कथित घोटाळ्यामध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी हे प्रमुख आरोपी होते. दरम्यान त्यांच्यावर खटला चालू होता. या प्रकरणात मुंबईतील एका न्यायालयाने मुंबई पोलिसांची याचिका स्वीकारली आणि ‘बनावट टीआरपी’ प्रकरणातील खटला मागे घेण्यास परवानगी दिली आहे. या प्रकरणात रिपब्लिक टीव्ही चॅनेलसह काही चॅनेल्सवर फसवणूक करून दर्शकांची संख्या वाढविल्याचा आरोप करण्यात आला होता. यात अर्णब गोस्वामी यांना आरोपी करण्यात आले होते.
मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयासमोर दाखल केलेल्या फिर्यादीने आपल्या याचिकेत सांगितले की, हा खटला पुढे नेण्यासाठी कोणीही पीडित नसून, यात दोष सिद्ध होणार नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘बनावट टीआरपी’ गोठल्याची तक्रार BARC ने केली होती. २०२० मध्ये BARC दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे नाव देखील होते. या प्रकरणात न्यायालयाने खटला मागे घेण्यास परवानगी दिली आहे.