शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तर आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने यासंबंधीची कागदपत्रे विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
1 एप्रिलपर्यंत यासंबंधीची कागदपत्रे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का आहे. तसेच याबाबतची पुढील सुनावणी ही 8 एप्रिल रोजी होणार आहे.
आजच्या या सुनावणीत ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदे गटाकडून मुकुल रोहोतगी, महेश जेठमलानी आणि हरीश साळवे यांनी बाजू मांडली.
यावेळी सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई खटल्यात जो निकाल दिला होता त्यातील पॅराग्राफ 144 चा उल्लेख दोन वेळा केला. यामध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सुचवले होते की, निवडणूक आयोगाने जरी पक्षाबाबत काहीही निकाल दिलेला असला तरी तुम्हीही अगदी तसाच निकाल दिला पाहिजे असे नाही. त्यामुळे कागपत्रे तपासून तुमच्या सद्सदविवेकबुद्धीने निकाल द्यावा.