पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिन्यांनंतर ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अखेर १० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे नवीन टर्मिनलचे उद्घाटन करण्याचा मुहूर्त ठरला आहे. यानंतर ४ ते ६ आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नवीन टर्मिनलवरून विमान उड्डाण सुरू होईल.
पंतप्रधान मोदी एकाच वेळी ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनऊ या विमानतळांवरील नवीन टर्मिनल आणि अलिगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, वाराणसी, कडप्पा, हुबळी आणि बेळगाव या विमानतळांच्या नवीन टर्मिनलचे भूमिपूजन करणार आहेत. हे प्रकल्प एकूण १२ हजार ७०० कोटी रुपयांचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १० मार्चला दुपारी १२ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन होईल.
पुणे विमानतळाच्या उद्घाटनानंतर, ऑपरेशनसाठी तयार होण्यापूर्वी सुमारे चार ते सहा आठवडे विमानतळावर सुरक्षा चाचण्या घेतल्या जातील. 423 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या, ह्या पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे बिल्ट-अप क्षेत्र 51,595 चौरस मीटर आहे आणि ते भारतीय हवाई दलाकडून अधिग्रहित केलेल्या जागेवर बांधले गेले आहे. विमानतळाच्या इमारतीच्या आत आणि बाहेर महाराष्ट्रीयन संस्कृती प्रदर्शित केली आहे. भारतीय संस्कृती विविधतेने भरलेली आहे आणि विमानतळांच्या माध्यमातून ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पुणे विमानतळावर, शनिवार वाड्यासारखा दर्शनी भाग आहे आणि छतावर राज्याची इतर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक चिन्हे देखील प्रदर्शित केली आहेत, तसेच या नवीन टर्मिनल इमारतीची प्रवासी हाताळणी क्षमता प्रतिवर्ष 12 दशलक्ष प्रवाशांची असेल,