आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम, अरुणाचल, बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान पंतप्रधान अनेक राज्यांमध्ये हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची झंझावाती शैलीत उद्घाटन, आणि पायाभरणी करणार आहेत.
मात्र या अतिशय व्यस्त दिनक्रमामध्ये वेळ काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे असाम आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी केली. पंतप्रधान मोदींनी उद्यानाच्या ‘मध्य कोहोरा रेंज’च्या मिहिमुख परिसरात प्रथम हत्तीची सवारी घेतली. त्यानंतर जीपने सफारी केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि इतर वरिष्ठ वन अधिकारीही होते.आणि या सफारीचा एक सुंदर व्हिडिओ पंतप्रधानांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्टही केला आहे.
ही काझीरंगाची सफर अविस्मरणीय भेट असून मी जगभरातील लोकांना येथे येण्यासाठी आमंत्रित करतो असे त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हंटले आहे.
https://x.com/narendramodi/status/1766381410456051826?s=20
यानंतर अरुणाचल मधल्या आजच्या सेला या बोगद्याचे उदघाटन, आसाममधील जोरहाट येथे विकास उपक्रमांच्या शुभारंभ, लचीत बडफुकन यांच्या पुतळ्याचे उदघाटन, विकसित भारत विकसित नॉर्थ इस्ट कार्यक्रम, रोड शो यानंतर आसामच्या जोरहाटमध्ये पंतप्रधान मोदींनी पायाभरणी, विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी जनसमुदायालाही त्यांनी संबोधित केले.
यानंतर दुपारच्या सत्रात वेळ काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या चहाच्या मळ्यात पोचले त्याबद्दलही एक्स अकाऊंटला पोस्ट टाकत त्यांनी पर्यटकांना आसामच्या चहाच्या बागांना भेट देण्याचे आवाहन केले.आसाम त्याच्या उत्कृष्ट चहाच्या बागांसाठी ओळखला जातो आणि आसामच्या चहाने जगभर आपले स्थान निर्माण केले आहे.याबाबतचा उल्लेख त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये केला आहे. चहाचा मळा कसा पिकवला जातो? त्याची निगा कशी राखली जाते? याबाबत पंतप्रधानांनी माहिती घेतली आहे .
https://x.com/narendramodi/status/1766380562770461097?s=20
यानंतर पंतप्रधान मोदी संध्याकाळी ‘विकसित भारत विकसित वेस्ट बंगाल’ या कार्यक्रमात पोचणार आहेत तसेच त्यानंतर वेस्ट बंगालमध्येच सिलीगुड़ी येथे जनसमुदायाला संबोधित करणार आहेत. विकासकामांच्या उद्घाटनानंतर सायंकाळी ते वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत.