लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचा राजीनामा राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. अरूण गोयल यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, मात्र त्याधाची त्यांनी राजीनामा दिल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूनेमध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे, जो 9 मार्च 2024 पासून प्रभावी मानला जाईल.
लोकसभा निवडणूक काही आठवड्यांवर येऊन ठेपली असतानाच अरूण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. अरूण गोयल यांनी राजीनामा दिल्यामुळे आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार उरले आहेत. तर भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांव्यतिरिक्त दोन निवडणूक आयुक्त आहेत. तसेच गोयल यांनी राजीनामा दिल्यामुळे आता निवडणूक यंत्रणेची संपूर्ण जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी अरूण गोयल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत अनेक राज्यांचा दौरा केला होता. मात्र, अचाकन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.