ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. बहारमपूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात पक्षाने माजी क्रिकेटर युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. तर पक्षाने बशीरहाटमधून अभिनेत्री नुसरत जहाँचे तिकीट रद्द केले आहे.
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यांनी सांगितले की, आसनसोलमधून लोकसभेसाठी टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा असतील. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1766748720786190694
कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसची (TMC) रॅली घेत आहेत. त्याला जन गर्जन सभा असे नाव देण्यात आले आहे. टीएमसीचे सरचिटणीस आणि ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे देखील ब्रिगेड मैदानावर उपस्थित आहेत. या रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आज मी बंगालच्या 42 लोकसभा जागांसाठी तृणमूलचे 42 उमेदवार पुढे आणणार आहे.
TMC ने जाहीर केलेल्या 42 उमेदवारांची यादी:
1 कूच बिहार (एससी)- जगदीश सी बसुनिया
2 अलीपुरद्वार (एसटी)- प्रकाश चिक बड़ाइक
3 जलपाईगुड़ी (एससी)- निर्मल चौधरी रॉय
4 दार्जिलिंग- गोपाल लामा
5 रायगंज- कृष्णा कल्याणी
6 बालुरघाट- बिप्लब मित्रा
7 मालदा उत्तर- प्रसून बनर्जी
8 मालदा दक्षिण- शाहनवाज अली रैहान
9 जंगीपुर- खलीलुर्रहमान
10 बरहामपुर- युसूफ पठान
11 मुर्शिदाबाद- अबू ताहेर खान
12 कृष्णानगर- महुआ मोइत्रा
13 रानाघाट (एससी)- मुकुट मणि अधिकारी
14 बोंगांव- विश्वजीत दास
15 बैरकपुर- पार्थ भौमिक
16 दम दम- प्रोफेसर सौगत रॉय
17 बारासात- काकोली घोष दस्तीदार
19 जॉयनगर (एससी)- प्रतिमा मंडल
20 मथुरापुर (एससी)- बापी हलदर
21 डायमंड हार्बर- अभिषेक बनर्जी
22 जादवपुर- सायोनी घोष
23 कोलकाता दक्षिण- माला रॉय
24 कोलकाता उत्तर- सुदीप बंधोपाध्याय
25 हावड़ा- प्रसून बनर्जी
26 उलूबेरिया- सजदा अहमद
27 सेरामपुर- कल्याण बनर्जी
28 हुगली- रचना बनर्जी
29 आरामबाग (एससी)- मिताली बाग
30 तमलुक- देबांगशु भट्टाचार्य
31 कंठी -उत्तम बारिक
32 घाटल- दीपक अधिकारी (देव)
33 झारग्राम (एसटी)- कालीपाड़ा सोरेन
34 मेदिनीपुर- जून मालिया
35 पुरुलिया- शांतिराम महतो
36 बांकुरा- अरूप चक्रवर्ती
37 बिष्णुपुर (एससी)- सुजाता मंडल
38 बर्धमान पुरबा (एससी)- डॉ शर्मिला सरकार
39 बर्धमान दुर्गापुर- कीर्ति आजाद
40 आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा
41 बोलपुर (एससी)- असित कुमार मल
42 बीरभूम- शताब्दी रॉय