पुणेकरांसाठी देखील एक आनंदाची बातमी आहे. कारण आता पुणेकरांचा हवाई प्रवास अधिक सुखकर होणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या लोहगाव येथील विमानतळावरील नवीन टर्मिनलचे लोकार्पण केले आहे. या नवीन टर्मिनलमुळे देशातील प्रवाशांना सुखकर आणि सुलभ प्रवास करता येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पणावेळी म्हणाले. पुढील काही आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नवीन टर्मिनलवरून उड्डाण सुरु करण्यात येणार आहे.
पुणे एक महत्वाचे शहर आहे. पुणे जिल्हा आयटी हब आहे. देश विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपुरे होते. नवीन टर्मिनल उभे करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. संरक्षण मंत्रालयाने नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार फडणवीसांनी दिले. या नवीन टर्मिनलबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात विमानतळाचे रनवे विकसित करून विमानतळाचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा असणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात एकत्रितपणे देशातील विमानतळे विकसित करणात येत आहेत. अनेक नवीन विमानतळाचे बांधकाम सुरु आहे. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलवर स्थानिक संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आला आहे. या नवीन टर्मिनलची क्षमता ३ हजार प्रवाशांची आहे. देशामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये विमानतळाची संख्या वाढली आहे.