आज मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे लोकार्पण आज करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. दरम्यान यावेळी संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली आहे.
आज कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे मुंबईकरांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंडे फडणवीस म्हणाले, ”कोस्टल रोडचे निर्माण करताना सीआरझेडचे नियम आडवे यायचे. त्यावेळी मागच्या सरकारमधले दिल्लीला जायचे आणि हात हलवत यायचे. मी सरकारमध्ये असताना पुढाकार घेतला आणि आम्ही हा पप्रकल्प ग्रीनरी करू असा केंद्राला शब्द दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगून देखील काही अधिकारी यात अडचणी आणत होते. अनिल माधव दवे हे आजारी असताना देखील एका बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांच्यामुळे फायनल नोटिफिकेशन निघाले. हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात याविरुद्ध याचिका दाखल झाल्या. मात्र आम्ही सगळीकडे जिंकलो. मी सगळे करून आणले तरी भूमिपूजनाच्या वेळी मी मुख्यमंत्री होतो तरी, मला त्यांनी बोलावले नाही. त्यावेळी मी सगळे रोखू शकलो असतो, मात्र मी तसे केले नाही. एक देवेंद्र फडणवीस येईल आणि जाईल मात्र नाव कायम आठवणीत राहील. कोण कोत्या मनाचे आणि कोण मोठ्या मनाचे आहे हे लवकरच पाहायला मिळेल.”
कोस्टल रोडचे एका मार्गिकेचे लोकार्पण आज करण्यात आले आहे. या सोहळ्याला अनेक खासदार, मंत्री, आमदार आणि अधिकारी उपस्थिती होते. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या मार्गावरून प्रवास करताना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान या सोहळ्याला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना जोरदार टोले लगावले आहेत. कोस्टल रोडचे आज एका मार्गिकेचे लोकार्पण होत असून, दुसरी मार्गिकही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम महायुती सरकारने केले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.