क्रिस्टोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने यावर्षी 7 ऑस्कर जिंकून इतिहास रचला आहे. या प्रसिद्ध दिग्दर्शकाने केवळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत ऑस्कर 2024 जिंकले नाही तर त्याच्या चित्रपटातील स्टार कास्ट आणि क्रूने देखील ऑस्करवर आपले नाव कोरले आहे.
‘ओपनहायमर’ चित्रपटातील आपल्या मुख्य भूमिकेने सर्वांची मने जिंकणाऱ्या सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच रॉबर्ट डाउनी ज्युनियरने त्याच्या कारकिर्दीतील पहिला ऑस्कर 2024 पुरस्कार जिंकला आहे. एम्मा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि ‘ओपेनहायमर’लाही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. यासह ‘ओपेनहायमर’ने 13 श्रेणींमध्ये नामांकनानंतर 7 ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.
एम्मा स्टोन स्टारर ‘पूअर थिंग्ज’ या कॅटेगरीत नामांकन झाल्यानंतर 3 ऑस्कर पुरस्कार जिंकले. एम्माचा हा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे. या चित्रपटासाठी एम्मा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी 2016 मध्ये ‘ला ला लँड’ या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
याशिवाय, ‘पुअर थिंग्स’ ने 3 श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन, प्रोडक्शन डिझाइन, मेक-अप आणि हेअरस्टाइलिंग श्रेणींमध्ये ऑस्कर मिळाले आहेत. तर ‘बार्बी’ला 8 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते आणि त्यामध्ये त्यांना 1 पुरस्कार मिळाला.
‘ओपनहायमर’ने जिकलेले 7 पुरस्कार
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – क्रिस्टोफर नोलन (ओपनहायमर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: रॉबर्ट डाउनी जूनियर, ‘ओपनहायमर’
सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन: ‘ओपनहायमर’
सर्वोत्कृष्ट छायांकन – ‘ओपनहायमर’
लुडविग गोरानसन सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर – ‘ओपनहायमर’
सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिलियन मर्फी
सर्वोत्कृष्ट चित्रपट – ‘ओपनहायमर’