निवडणूक रोखे प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी महत्वाचा निर्णय दिला होता. त्याबाबत कोर्टाने एसबीआयला देखील काही महत्वाचे निर्देश दिले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने एसबीआयला मोठा दणका दिला आहे. २४ तासांच्या आतमध्येच म्हणजे उद्याच कामकाज संपण्यापूर्वी निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे महत्वाचे आदेश सुप्रीम कोर्टाने एसबीआयला दिले आहेत. निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी जूनपर्यंत वेळ देण्याची मागणी एसबीआयकडून करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी जूनपर्यंत वेळ देण्याची मागणीची याचिका एसबीआयने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने २४ तासांमध्ये म्हणजे उद्याच निवडणूक रोख्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीदरम्यान तुम्ही इतके दिवस काय केले असा सवाल कोर्टाने विचारला.
१५ मार्चच्या संध्याकाळपर्यंत निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची माहिती वेबसाईटवर सादर करावी असे आदेश देखील सुप्रीम कोर्टाने दिले. एसबीआयने निवडणूक रोखण्यासंदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास, कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील सुप्रीम कोर्टाने दिला आहे. निवडणूक रोख्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारी रोजी महत्वाचा निर्णय दिला होता. तसेच १३ मार्चपर्यंत माहिती देण्यास एसबीआयला निर्देश देखील दिले होते. एसबीआयच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. दरम्यान एसबीआयची वेळ वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच २४ तासांत माहिती सादर करण्याचे आदेश एसबीआयला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.