सध्या केंद्र सरकार रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास करताना दिसत आहे. रेल्वेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहे. भारतात तयार झालेली वंदे भारत एक्सप्रेस सध्या देशातील अनेक मार्गांवर धावत आहे. स्वच्छ, जलद आणि आरामदायी सुविधा देणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहेत. आता त्यातच पुण्यात आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहेत. पुणेकरांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे.
पुण्यातून दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहेत. पुणे ते वडोदरा आणि पुणे ते सिकंदराबाद अशा या दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध शहरांमधून १० वंदे भारत गाडयांना हिरवा कंदील दाखवणार आहेत. पहिली वंदे भारत एक्सप्रेसशी मुंबई ते गांधीनगर दरम्यान सुरु करण्यात आली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी या ट्रेन्स सुरु करण्यात आलाय आहेत. आता अजून १० वंदे भारत ट्रेन सुरु होणार असून, राज्यातून २ ट्रेन्स धावणार आहेत.
देशातील विविध तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात येत आहेत. अयोध्येचा देखील अनेक ठिकांणांवरून या ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत. राज्यात शिर्डी तीर्थक्षेत्रासाठी देखील वंदे भारत ट्रेन चालवली जात आहे. तसेच कदाचित लवकरच पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली जाण्याची शक्यता आहे. अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनच्या यशस्वी लॉंचिंगनंतर आता वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन देखील लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.