देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दररोज हजारो कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशभरात तब्बल ८५.००० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. याचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रातील तब्बल ५०६ प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे देशभरात आज एकूण १० वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच रेल्वेच्या अनेक नवीन प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत.
पुणेकर नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी ahem aaj पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेल्वेच्या विकासकामांच्या उद्घाटनासह १० वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दरम्यान त्यातील दोन तीन या पुण्यातून सुरू केल्या जाणार आहे. पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते वडोदरा अशा दोन नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहेत. तसेच विविध तीर्थक्षेत्राना जोडण्यासाठी देखील या ट्रेन्स सुरू केल्या जात आहेत. लवकरच मुंबई ते शेगाव व पुणे ते शेगाव अशा वंदे भारत ट्रेन्स सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात शिर्डी येथे ही ट्रेन सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात येत्या काही काळामध्ये आणखी नवीन मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन देखील लवकरच लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.