पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर हे समस्त राज्यातील आणि देशातील नागरिकांचे श्रद्धेचे स्थान आहे. आषाढी वारीनिमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी, भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देतात आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेतात. दरम्यान पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराबाबत मंदिर समितीने एक मोठा निर्णय घेतला आहे. १५ मार्च पुढील दीड महिना विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे बंद राहणार आहे. याबाबतचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर १५ मार्चपासून पुढील दीड महिना बंद राहणार आहे. मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. पुढील दीड महिना मंदिरामध्ये पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. भाविकांना केवळ मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. तसेच यामुळे केवळ मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे. मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी मंदिर दीड महिना बंद राहणार आहे. मंदिरातील ग्रॅनाईट लादी देखील काढली जाणार आहे. यामुळे भाविकांना सकाळी ५ ते दुपारी ११ या वेळेत केवळ मुख दर्शन घेता येणार आहे.