आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. राजस्थानच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी पोखरण येथे भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी हे पोखरण येथील त्रीसेवा अभ्यासामध्ये ‘भारत शक्ती’ चे सामर्थ्य पहिले. यावेळी पंतप्रधान मोदीसंह ३० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मंगळवारी या तिरंगी सेवा सरावाचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या सर्वांचे स्वागत केले.
भारतीय लष्कराचे प्रमुख मनोज पांडे म्हणजे, ”आज आम्ही स्वदेशी हत्यारांची मारक क्षमता आणि तिन्ही संरक्षण दलांच्या एकत्रित कसरती पाहण्यासाठी जमलो आहोत. आज त्रिसेवा प्रमुख उपकरण आणि शस्त्रे प्रणालींचे प्रदर्शन केले जाणार आहे.” सध्या भारत देश शस्त्रास्त्रे निर्मितीमध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ”मी आज पोखरणमध्ये जाण्यास उत्सुक आहे. या ठिकाणाचा प्रत्येक भारतीयाशी भावनिक संबंध आहे. पोखरण येथे मला त्रि-सेवांच्या थेट फायर आणि मॅन्युव्हर सरावांमध्ये स्वदेशी संरक्षण क्षमतेचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळेल. ते पुढे म्हणाले की, मला आनंद आहे की या कार्यक्रमात शस्त्रास्त्र प्रणाली आणि बरेच काही समाविष्ट आहे जे भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.”
राजस्थानमधील पोखरण येथील भारत शक्ती सरावात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ”आज आपले पोखरण पुन्हा एकदा भारताच्या आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाचे साक्षीदार बनले आहे. हे पोखरण भारताच्या अणुशक्तीचे साक्षीदार आहे आणि आज येथे आपण स्वदेशीकरण आणि सक्षमीकरणाद्वारे त्याची ताकद पाहत आहोत. शौर्याची भूमी असलेल्या राजस्थानमध्ये हा ‘भारत शक्ती’चा उत्सव होत आहे, पण त्याची प्रतिध्वनी केवळ भारतातच नाही तर जगभर ऐकू येत आहे.