गुजरातमधील पोरबंदरजवळ ड्रग्जची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत 450 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी 6 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) च्या अधिकाऱ्यांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी काल रात्री पाकिस्तानी नागरिकांना भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करताना पकडले. गेल्या 30 दिवसांत गुजरातच्या किनाऱ्यावर जप्त करण्यात आलेली ही दुसरी मोठी ड्रग्सची खेप आहे.
यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी गुजरातच्या किनाऱ्याजवळ संशयित पाकिस्तानी क्रू सदस्यांनी चालवलेल्या बोटीतून किमान 3,300 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत 2,000 कोटी रुपयांहून अधिक होती. भारतीय उपखंडातील अंमली पदार्थांची ही सर्वात मोठी जप्ती आहे. तर भारतीय तटरक्षक दलाने यापूर्वीही समुद्रात अनेक कारवाईत कोटयावधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते.