छत्रपती शिवाजी महाराजांचा सात फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा आसाममधील जोराहाट येथे २९ मार्च रोजी उभारण्यात येणार आहे. २१ पॅरा स्पेशल फोर्स, २१ वाघनखं परिवार आणि ऑल इंडिया एक्स सर्व्हिसमन वेल्फेअर असोसिएशनच्या पुढाकाराने हा पुतळा उभारण्यात येत आहे.नऱ्हे येथील शिल्पकार खटावकर यांच्या स्टुडिओत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नुकतेच पूजन करण्यात आले. या वेळी जनरल शिशिर महाजन, ब्रिगेडियर गोविंद इलंगोवन, ब्रिगेडियर पी. टी. घोगले, कर्नल एस. राजगोपाल, कॅप्टन स्वामिनाथन, मेजर बी. धामणकर, कर्नल एच. डी. खांडगे, कर्नल संभाजी पाटील, कर्नल राजगोपालन आदी उपस्थित होते.
हा पुतळा शिल्पकार विराज विवेक खटावकर यांनी दोन महिन्यांत साकारला आहे. ‘२१ वाघनखं परिवार’च्या सर्व कमांडोज व परिवारने या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. खटावकर म्हणाले, ‘‘जोराहाट येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा इपॉक्सी व पॉलिस्टर रेझिनमध्ये तयार करण्यात आला आहे.