आज (13 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘इंडियाज टेक्ड: चिप्स फॉर डेव्हलप्ड इंडिया’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ते गुजरातमधील धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन आणि आसाममधील सानंद, मोरीगाव येथे सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांमुळे सेमीकंडक्टर इको-सिस्टम मजबूत होईल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
पीएम मोदींनी X वर पोस्ट केले की, सेमीकंडक्टरचे प्रमुख केंद्र बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये हा एक विशेष दिवस असेल. 60,000 हून अधिक संस्थांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी तरुणांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, पीएम मोदी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंचित घटकांमधील उद्योजकांना कर्ज सहाय्यासाठी पोहोच कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत.
तसेच पंतप्रधान नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम अंतर्गत सफाई मित्रांना (गटार आणि सेप्टिक टँक कामगार) आयुष्मान हेल्थ कार्ड आणि पीपीई किटचे वाटप करणार आहेत.