रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एनआयएने एका संशियाताला ताब्यात घेतले आहे. बल्लारीच्या कोल बाजारामधून शब्बीर नावाच्या एका संशयित व्यक्तीला एनआयएने ताब्यात घेतले आहे.
शब्बीर नावाच्या संशयित व्यक्तीला त्याच्या ट्रव्हल्स हिस्ट्रीवरून ताब्यात घेण्यात आले आहे. तर रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचा सूत्रधार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI) एक सक्रिय सदस्यआहे, असा संशय एनआयएला आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे दहशतवादी संघटनांशी जवळचे संबंध आहेत. तर पीएफआयने अनेक लोकांचे ब्रेनवॉश केले असून त्यामध्ये संशियाताचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी एनआयएने संशयित व्यक्तीचे फोटो समोर आणले होते. तसेच यंत्रणेने संशयित आरोपीला शोधून देण्याचे आवाहन लोकांना केले होते. एनआयएने आरोपी कुठे दिसल्यास 08029510900, 8904241100 या मोबाईल क्रमांकावर किंवा info.blr.nia@gov.in या वेबसाईटवर कळवण्याचे आवाहन केले होते. सोबतच आरोपीला पकडून देणाऱ्यास बक्षिस देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती.
दरम्यान, संशयित आरोपीने एका बसमधून प्रवास केला होता. त्यावेळी त्याच्या तोंडावर मास्क लावलेला होता. त्यानंतर तो मशिदीजवळ आढळून आला होता. तर त्याच्या ट्रव्हल्स हिस्ट्रीवरून आज एनआयएला आरोपीला शोधण्यात यश आले आहे.