पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘इंडियाज टेक्ड: चिप्स फॉर डेव्हलप्ड इंडिया’ कार्यक्रमात भाग घेतला आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर सुविधांची पायाभरणी केली.
आजचा ऐतिहासिक प्रसंग हे भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत .” आजचे प्रकल्प भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. ते म्हणाले की चिप उत्पादनामुळे विकासाची दारे आणि अमर्याद शक्यता उघडतील. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या क्षेत्रातही मोठी प्रगती होईल”.
“उज्ज्वल भविष्याकडे झेप घेताना आज आम्ही इतिहास रचत आहोत. आम्ही भारतात सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर उत्पादनासाठी तीन मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. या प्रकल्पांमुळे भारताला सेमीकंडक्टर उत्पादनात जागतिक केंद्र बनण्यास मदत होईल,” पीएम मोदी म्हणाले.
“आज, भारत प्रगतीसाठी, आत्मनिर्भरतेसाठी आणि जागतिक पुरवठा साखळीत आपल्या उपस्थितीसाठी सर्वांगीण विकासाच्या दिशेने पुढे जात आहे आहे हे भारतातील युवा पिढी बघत आहे. या प्रयत्नांमुळे त्यांचा आत्मविश्वास देखील वाढेल आणि जिथे आत्मविश्वासपूर्ण तरुण असेल तिथे ते देशाचे नशीब बदलतात ह्यावर माझा विश्वास आहे. ” असे पंतप्रधान म्हणाले.
सेमीकंडक्टर हे भविष्यातील विकासाचे प्रवेशद्वार असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आजचे निर्णय आणि धोरणे भविष्यात आपल्याला धोरणात्मक फायदे देतील. २१ वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित आहे. इलेक्ट्रॉनिक चिप्सशिवाय जगाची कल्पनाही करता येत नाही. ‘मेड इन इंडिया’ आणि ‘डिझाइन इन इंडिया’ चिप्स भारताला नवीन यश मिळवण्यास मदत करतील. तसेच भारताला स्वावलंबनात आणि आत्मनिर्भर बनण्यात नवीन टप्पे गाठण्यास मदत होईल.
“भारत आतापर्यंत तंत्रज्ञान .अणुशक्ती आणि डिजिटल क्षेत्रातल्या प्रगतीकडे वेगाने वाटचाल करत महासत्ता बनला आहे. पुढील काळात, आम्ही सेमीकंडक्टर आणि संबंधित उत्पादनांचे व्यावसायिक उत्पादन सुरू करू. भारत लवकरच या क्षेत्रातही जागतिक शक्ती बनेल,” असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला आहे.
भारताच्या सेमीकंडक्टरच्या स्वप्नाकडे पूर्वीच्या सरकारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करून पंतप्रधान म्हणाले की, भारताने 1960 च्या दशकात सेमीकंडक्टर उत्पादनाचे स्वप्न पाहिले होते परंतु मागील सरकारांच्या इच्छाशक्ती आणि वचनबद्धतेच्या अभावामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांचा अदूरदर्शी दृष्टीकोन भारताच्या प्राधान्यक्रम आणि क्षमतांमध्ये समतोल राखू शकला नाही, ज्यामुळे सेमीकंडक्टर क्षेत्राच्या विकासास विलंब झाला.
गेल्या महिन्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी तीन सेमीकंडक्टर सुविधा प्रकल्पांना मान्यता दिली आहे. सेमीकंडक्टर इकोसिस्टम वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नात, गुजरातमधील साणंद येथे निर्माणाधीन चिप प्लांट व्यतिरिक्त, तीन नवीन चिप प्लांट – गुजरातमध्ये दोन आणि आसाममध्ये एक स्थापित केले जात आहेत. टाटा समूह या तीनपैकी दोन नवीन प्लांट उभारत आहे.