दरवर्षी मार्च महिन्यातील दुसरा बुधवार हा जागतिक धूम्रपान निषेध दिन म्हणून नॅशनल हेल्थ पोर्टलने ठरवला आहे.या वर्षी आज म्हणजे १३मार्च रोजी आपण हा दिवस साजरा करीत आहोत.
धूम्रपानामुळे होणारे गंभीर परिणाम लोकांना कळावे,त्याबाबत त्यांनी सजग व्हावे आणि जे लोक धूम्रपान करत आहेत त्यांनी या पासून परावृत्त व्हावे हा मुख्य हेतू आहेच.शिवाय
आज अनेक स्त्रिया आणि लहान मुले देखील या व्यवसायाशी निगडित आहेत.मुलांवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन या वर्षी अश्या मुलांचे संरक्षण ही मुख्य थीम ठरवली आहे.मागच्या वर्षी we need food, not tobacco. अशी घोषणा होती.
सन १९८४ पासून या चळवळीची सुरुवात झाली.धूम्रपानामुळे शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतात.खोकला,घशातील आग, हार्ट अटॅक, कॅन्सर , न्यूमोनिया असे जीवघेणे आजार होऊ शकतात,स्वतः बरोबर च दुसऱ्यांनाही याचा त्रास होतो. आईमुळे गर्भातील मुला वर देखील परिणाम होतो ,एवढेच नव्हे तर तंबाखू ची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा याचा धोका संभवतो .
क्षणिक समाधान मिळावे म्हणून हे व्यसन सहज लागते पण सुटणे फार कठीण आहे.म्हणूनच एकत्रित प्रयत्न केले तरच या व्यसनाला आळा बसेल अशा हेतूने असे उपक्रम राबविले जातात..
आज या दिनाच्या निमित्ताने जनजागृती व्हावी हीच अपेक्षा.
‘जागतिक धूम्रपान निषेध दिन’ साजरा केला जातो त्याविषयी थोडक्यात माहिती अशी की
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सदस्य देशांनी जगाला धूम्रपान सेवनामुळे होणारे धोकेआणि धोक्यांविषयी जागरूक करण्यासाठी आणि त्याचे उत्पादन आणि सेवन कमी करण्यासाठी मूलभूत कारवाई करण्यासाठी 31 मे हा दिवस निश्चित केला आहे.
जसा दरवर्षी 31 मे रोजी जसा जागतिक धूम्रपान दिन म्हणून साजरा केला जातो तसा मार्च मध्ये धूम्रपान निषेध दिन असतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगातील सुमारे 125 देशांमध्ये तंबाखूचे उत्पादन होते.
जगभरात दरवर्षी सुमारे 5.5 ट्रिलियन सिगारेट तयार होतात आणि एक अब्जाहून अधिक लोक त्याचा वापर करतात.
अहवालानुसार, जगभरात 80%टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात, परंतु काही देशांमध्ये स्त्रियांमध्ये धूम्रपान करण्याची सवय लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
भारत , 10 अब्ज सिगारेट आणि 72.5 दशलक्ष किलो तंबाखूचे उत्पादन करतो.या अहवालानुसार, भारतातील खूप जास्त लोक गुटखा, बीडी, सिगारेट, हुक्का इत्यादी माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात.
जगभरातील सुमारे १०% धूम्रपान करणारी व्यक्ती भारतात आहेत,
तंबाखूच्या निर्यातीच्या बाबतीत ब्राझील, चीन, अमेरिका, मलावी आणि इटलीनंतर भारत सहाव्या क्रमांकावर आहे.
विकसनशील देशांमध्ये, दरवर्षी 8,000 मुले पालकांच्या धूम्रपानांमुळे मरण पावतात.
जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत भारतात तंबाखूजन्य आजाराने मृत्यू होण्याची संख्या अतिशय वेगवान आहे.
सिगारेट आणि तंबाखू हे तोंड, पाठीचा कणा, घसा आणि मूत्राशय कर्करोगाच्या स्वरूपात प्रभावी आहे.
सिगारेट आणि तंबाखूमध्ये उपस्थित कर्करोगयुक्त पदार्थ शरीराच्या चांगल्या पेशींची वाढ थांबवून कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस मदत करतात.) दीर्घकाळ धूम्रपान केल्याने तोंड, गर्भाशय, मूत्रपिंड आणि पाचक ग्रंथीमध्ये कर्करोग होण्याची शक्यता असते.
हृदय आणि मेंदूच्या आजारांवर मुख्य उपाय म्हणजे धूर नसणे, आणि धूम्रपान न करणे हे आहेत .
भारतात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे, तरीही कायदा व सुव्यवस्था बिघडल्यामुळे ती लागू केली जात नाही. भारतातील आर्थिक बाबींविषयीच्या संसदीय समितीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास यापूर्वीच मान्यता दिली आहे. तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावीपणे राबविणे आणि तंबाखूच्या हानिकारक प्रभावांविषयी जनजागृती करणे हा यामागील हेतू आहे.
सौ. मेघना कुलकर्णी , सोलापूर.
सौजन्य -समिती संवाद ,पश्चिम महाराष्ट्र प्रांत