आज (14 मार्च) माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील ‘वन नेशन-वन इलेक्शन’ या विषयावरील उच्चस्तरीय समितीने राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना 18,626 पानांचा आपला अहवाल सादर केला आहे. तसेच हा अहवाल 2 सप्टेंबर 2023 रोजी त्याच्या निर्मितीवर तज्ञांसोबत चर्चा करून तसेच 191 दिवसांच्या संशोधनानंतर सादर करण्यात आला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची माहिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे. तर रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि ‘वन नेशन-वन इलेक्शन’ या विषयावर आपला अहवाल सादर केला.
कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत गृहमंत्री अमित शाह, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. सिंह, लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांचा समावेश आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 100 दिवसांत घेता येतील, अशी माहिती समितीनी दिली आहे.