निवडणूक आयोगातील निवडणूक आयुक्तांच्या 2 रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार यांची या पदांसाठी निवड करण्यात आली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समितीची बैठक झाली, त्यानंतर या दोन्ही नावांना मंजुरी देण्यात आली आहे.
यासंदर्भात समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, दोन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी आज बैठक झाली. निवडणुकीसाठी एकही जागा रिक्त राहू नये, असे आमचे मत आहे. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, अर्जुनराम मेघवाल आणि अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता. या बैठकीत 6 नावांवर चर्चा झाल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले आहे.
अरूण गोयल यांनी 9 मार्च रोजी आयुक्त पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी हा राजीनामा काही खासगी कारणामुळे दिल्याचे म्हटले जात आहे. तर गोयल यांच्या राजीनाम्यामुळे निवडणूक आयुक्त पदाच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी समितीच्या यापूर्वीही बैठका झाल्या होत्या. तर अखेर आज या पदांसाठी दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.