बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. तसेच त्याच्या निधनांनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. तसेच सुशांतची बहिण श्वेताने अनेकदा वेगवेगळ्या पोस्टमधून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात तातडीने न्याय मिळण्यासाठी तपास यंत्रणांकडे धाव घेतली होती. अशातच आता श्वेताने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
श्वेताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने म्हटले आहे की, 45 महिने झाले असूनही आमच्या कुटुंबियांना सुशांत सिंगच्या प्रकरणातून कोणताही न्याय मिळालेला नाही. या सगळ्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागत आहे.
मोदीजी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करते की, सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणातून कित्येक प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळालेली नाहीयेत. जर तुम्ही सीबीआय तपासाबाबत आम्हाला मदत केली तर बरे होईल. तुमच्या मदतीमुळे आम्हाला मोठा दिलासा मिळेल. सुशांतच्या निधनाला 45 महिने उलटले आहेत तरीही त्याबाबत कोणताही तपास झालेला नाही आणि आम्हाला त्यातून न्याय मिळालेला नाही. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही या प्रकरणाची दखल घ्यावी.
https://www.instagram.com/reel/C4e8CnbqPVm/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होता. तो ‘पवित्र रिश्ता’ या छोट्या पडद्यावरील मालिकेतून प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्याने छिछोर, पीके, एम एस धोनी द अनटोल्ट स्टोरी, केदारनाथ, राब्ता अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. तर सुशांतने 14 जून 2020 रोजी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यामुळे त्याच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.