सध्या सर्वांचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल आता वाजणार आहे. उद्या (16 मार्च) केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये 2024च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
उद्या संपूर्ण देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. तसेच एकिकडे निवडणुकांच्या घोषणा होणार असतानाच दुसरीकडे देशभरात आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष निवडणुकीच्या घोषणेकडे लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे. लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. तसेच या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केले जाणार आहे.
Tags: election commissionerlok sabha election 2024lok sabha electionsPress Conference by the Election Commission