पुणे दहशतवाद प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट पुण्यात रचला होता पुण्यातील कोंढवा भागात राहत असलेल्या एका घरात बॉम्ब तयार करण्याचे दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले होते. मागील वर्षी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.एनआयएने इसिस विरोधात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याप्रकरणी पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे .
मोहम्मद शाहनवाज आलम, रिझवान अली, अब्दुल्ला शेख, तल्हा लियाकत खान अशी चार आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. पुणे आणि महाराष्ट्रात दहशत पसरवण्याच्या मोठ्या कटात हे सर्व सामील होते.महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध महानगरांमध्ये गुन्हे करण्याचा आरोपींचा कट होता,असा खुलासा आरोपपत्रात करण्यात आला आहे.
मागच्या वर्षी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या दोन दहशतवाद्यांच्या चौकशीत बॉम्बस्फोटात बदल धक्कादायक माहिती उघड झाली होती . आता NIA कडून याप्रकरणी आणखी चार दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती उघड करण्यात आली आहे. यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.