बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर हृदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली आहे. आज सकाळी ही शस्त्रक्रिया पार पडली. अमिताभ बच्चन यांना आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या तेथे दाखल आहेत.
81 वर्षीय अमिताभ बच्चन यांना आज सकाळी 6 वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मिळालेल्या माहितीनुसार, बिग बी आज सकाळीच रुग्णालयात पोहोचले होते आणि त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. तर आज त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच असे म्हटले जात आहे की, अमिताभ बच्चन यांची अँजिओप्लास्टी हृदयाच्या कोणत्याही समस्येमुळे नसून पायात क्लॉट झाल्यामुळे करण्यात आली आहे.
काल संध्याकाळी एका कार्यक्रमात गेल्यानंतर त्यांना काहीसा अस्वस्थता जाणवू लागला, त्यानंतर आज सकाळी त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयात पोहोचल्यानंतरच त्यांना दाखल करून अँजिओप्लास्टी करण्यात आली.
तसेच अमिताभ बच्चन यांनी नुकतेच एक ट्विट शेअर केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “कायम कृतज्ञ….” अँजिओप्लास्टीनंतर अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांचे आभार मानत आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती चाहत्यांनी दिली आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या शस्त्रक्रियेची माहिती समजताच चाहत्यांनी त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्ते केली आहे. तसेच चाहत्यांनी बिग बींच्या उत्तम आरोग्यासाठी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.