सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण इंदूरमधील काँग्रेस नेते पंकज संघवी आणि महूचे माजी आमदार अंतर सिंह दरबार यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज पंकज सिंघवी आणि अंतर सिंह दरबार यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.
पंकज सिंघवी आणि अंतर सिंह दरबार हे दोन्ही नेते आपल्या शेकडो समर्थकांसह रात्री 11.30 च्या सुमारास राजधानीतील भाजपच्या प्रदेश मुख्यालयात पोहोचले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि राज्य सरकारचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांना भाजप पक्षाचे सदस्यत्व बहाल केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुटुंब देशात राज्यात सर्वाधिक वाढत असल्याचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी सांगितले. माळव्यातील काँग्रेसचे बडे नेते अंतर सिंह दरबार आणि पंकज सिंघवी यांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांनी प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला आहे. पक्षात सामील होणाऱ्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सांगितलेली विकासकामे पूर्णत्वास नेऊ अशी ग्वाही देतो, असेही मुख्यमंत्री यादव म्हणाले.