जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज अधिकृतरीत्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या दिल्ली कार्यालयात आज भाजपाचे राष्ट्रीय महासचिव, मीडिया प्रमुख अनिल बालून आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांच्या उपस्थितीत अनुराधा यांनी भाजपात प्रवेश केला.
केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा आज निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. त्याआधी अनुराधा पौडवाल यांचा भाजपप्रवेश झाला आहे. पौडवाल भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवतील का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी माहितीही समोर येत आहे. त्या भाजपाच्या स्टार प्रचारक होऊ शकतात.
अनुराधा पौडवाल या या हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी या भाषांमध्ये गायन केले आहे. 1973 मध्ये ‘अभिमान’ या चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले होते. चित्रपटांतील गाण्यांसोबतच त्या भजनांसाठीही विशेष ओळखल्या जातात.