आज थोड्याच वेळात दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणूक आयोगाची मोठी घोषणा होणार आहे.आता काही तासात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून यासंदर्भातील निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे. त्यामुळे आज दुपारपासूनच आचारसंहिता लागणार आहे.मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांच्यसह निवडणूक आयुक्त एस.एस. सिंह आणि ज्ञानेश कुमारही हजर आहेत.
दरम्यान, एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज लोकसभा आणि ४ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर देशभर आचारसंहिता लागू होणार आहे. २०१९ च्या तुलनेत यावेळी निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेला ६ दिवस उशीर झालेला असून घोषणेपूर्वी भाजपने २६७, काँग्रेसने ८२ उमेदवारांची घोषणा केली आहे.