२०२४ च्या लोकसभा निवडणुकांना १४ एप्रिलपासून सुरवात होत असून एकूण ७ टप्प्यांमध्ये ९६. ८ कोटी मतदार मतदान करण्यास पात्र असतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेला संबोधित करताना राजीव कुमार म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत निवडणुका घेण्यासाठी १०.५ लाख मतदान केंद्रे आणि १.५ कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील.
“देशाला खऱ्या अर्थाने उत्सवपूर्ण, लोकशाही वातावरण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. १७ व्या लोकसभेची मुदत १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभेची मुदतही संपुष्टात आली आहे. असे ते म्हणाले आहेत.
राजीव कुमार यांनी सांगितले की, अंदाजे ४९.७ कोटी मतदार पुरुष आहेत आणि ४७.१ कोटी महिला मतदार आहेत.तर २०-२९ वयोगटातील १९ . ४७ कोटी मतदार आहेत,” तसेच ४८,000 तृतीयपंथी आहेत.
निवडणूक एकूण सात टप्प्यात पार पडणार असून पहील्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला होणार आहे.
दुसरा टप्पा – २६ एप्रिल,
तिसरा टप्पा – ७ मे,
चौथा टप्पा -१३ मे,
पाचवा टप्पा – १२ मे,
सहावा टप्पा – २५ मे,
सातवा टप्पा – १ जून,
यात महाराष्ट्रातली निवडणूक पाचव्या टप्प्यात पार पडणार असून सर्व टप्प्यांची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.