पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भाजप आणि स्वत:च्या राजकीय तयारीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, तुम्ही 2029 वर अडकले आहात, पण मी 2047 साठी नियोजन करत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांची नजर 2047 वर आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही शासनाचे नवे मॉडेल विकसित केले आहे. तसेच आमच्या कार्यकाळात सरकारने त्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले ज्यांना पूर्वी फारच कमी प्राधान्य दिले जात होते.
2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या घोषणेवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्वात मोठा लोकशाही सण साजरा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. संपूर्ण जग अनिश्चिततेचा सामना करत आहे, पण भारताचा विकास वेगाने होत राहील.
मी ‘नेशन फर्स्ट’ने प्रेरित आहे, तर काही लोक ‘फॅमिली फर्स्ट’ने प्रेरित आहेत, असं म्हणत मोदींनी विरोधकांना टोला लगावला. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. सत्ता कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, येत्या पाच वर्षांत जनता निर्णायक धोरणे आणि निर्णय घेतील.